मंगळवार, मार्च ०१, २०२२
खासदार, आमदार दाम्पत्यांच्या हस्ते मोहबाळा - नायदेव रस्त्याचे लोकार्पण
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा: वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना व येथील नागरिकांना कोणत्याच प्रकारे त्रास होणार नाही, त्यासाठी प्रशासनाने तत्पर राहून काम करण्याची आग्रही भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची असते. मोहबाळा ते नायदेव या मार्गावर कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे या भागातील शेतीचे धुळीमुळे नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच, पाठपुरावा करून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील मोबदला देण्यात आला.
यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते मोहबाळा - नायदेव रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी साई वर्धा पॉवर जनरेशन प्रायवेट लिमिटेड चे अधिकारी माटे, सरपंच नंदू टेमुर्डे तसेच सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
त्यासोबतच या रस्त्यातून कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतीभाताई धानोरकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार मकवानी यांची उपस्थिती होती.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
