३१ मार्च २०२२
Home
चंद्रपूर
बिबट हल्ल्याप्रकरणी दुर्गापूर येथील वेकोलिच्या उपक्षेत्रीय कार्यालयात स्थानिक नागरिकांचा घेराव
बिबट हल्ल्याप्रकरणी दुर्गापूर येथील वेकोलिच्या उपक्षेत्रीय कार्यालयात स्थानिक नागरिकांचा घेराव
बिबट हल्ल्याप्रकरणी दुर्गापूर येथील वेकोलिच्या उपक्षेत्रीय कार्यालयात स्थानिक नागरिकांचा घेराव
दुर्गापूर परिसरात समतानगर येथे आठ वर्षीय प्रतीक शेषराव बावणे या बालकाचा बिबट्याने उचलून नेल्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाची स्थिती आहे. आज 31 मार्च रोजी साडेआकरा वाजता उपक्षेत्रीय कार्यालय दुर्गापूर येथे काॅग्रेसचे स्थानिक नेते प्रशांत भारती यांच्या नेतृत्वाखाली दुर्गापूर येथील ग्रामस्थांचा घेराव आंदोलन केले.
भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी प्रतीक शेषराव बावणे हा आई सोबत दुर्गापूर येथे आला होता. आईचे वडील तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले.
मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता. तितक्यात बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले. रात्रीच शोध घेतला असता मुंडके धडावेगळे सापडले. मागील महिनाभरापासून येथे वाघ आणि बिबट्या च्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असून, त्याला वेकोलिच्या खाणी कारणीभूत ठरत आहेत. वेकोलि प्रशासनाने या भागांमधील झाडे-झुडपे अद्यापही काढलेली नाहीत. त्यामुळे हिंस्त्र पशु येथे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वेकोलि प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेला वेकोलीला जबाबदार धरून काँग्रेसचे प्रशांत भारती यांच्या नेतृत्वात दुर्गापूर येथील स्थानिक नागरिकांनी वेकोलिच्या उप क्षेत्रीय कार्यालयात घेराव आंदोलन केला.
Locals surround Vekoli's sub-regional office in Durgapur in connection with the bibat attack
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
