३० मार्च २०२२
चंद्रपूरजवळ बिबट्याने नातवाला उचलून नेले; आज्याच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता नातू
दुर्गापूर परिसरात समता नगर परिसरात आज 30 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान लहान बालक खेळत असताना बिबट्याने बाळाला उचलून घेऊन गेले. बाळाचे नाव प्रतीक शेषराव बावणे वय आठ वर्षे असे नाव आहे.
ते बेलोरा तालुका भद्रावती येथील रहिवासी आहेत. मुलाचे आईचे वडील आज सकाळी मृत्यु पावले. त्यामुळे सर्व कुंटूब तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले.
मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता.तितक्यात बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले.प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली.मात्र त्या बालकाचे बिबट्याने लचके तोडले. त्या बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी अवयव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे.
Leopard picks up grandson near Chandrapur; The grandson had come for his grandmother's funeral
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
