माजी सभापतीवर बिबट्याचा हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ मार्च २०२२

माजी सभापतीवर बिबट्याचा हल्ला

जुन्नर /आनंद कांबळे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व त्यांचा मुलगा यांच्यावर बिबट्याचा हल्ला ,दोघेही जखमी झालेत.
कृष्णा लांडे व त्यांचा मुलगा चैतन्य हे दोघे जुन्नर हून मोटार सायकलवरुन घरी जात असताना आगर येथील दुहाती शिवारात बिबट्याने अचानक हल्ला केला. दोघांच्या डाव्या पायास चावा घेतला. त्यामुळे दोघेही जखमी झाले. त्याच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात  प्रतिबंधात्मक उपचार सुरु आहेत.

 आगर परिसरात मोटारसायकल वरुन जाणाऱ्या लोकांच्यावर बिबट्या हल्ला करत आहे.
या भागातील ऊसाचे  क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे बिबटे  रस्त्यावर व वस्तीत येत आहेत. याबाबत तातडीने वनखात्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. याबाबत उपवन संरक्षक  जुन्नर यांना निवेदन देण्यात आले,