प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते मधूर भांडारकर यांची स्टार 'कू' वर एन्ट्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ मार्च २०२२

प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते मधूर भांडारकर यांची स्टार 'कू' वर एन्ट्री

प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते मधूर भांडारकर यांची स्टार 'कू' वर एन्ट्री 'कू'वर

चाहत्यांसोबत रंगणार रुपेरी पडद्याच्या चर्चा
राष्ट्रीय, 9 मार्च, 2022: वास्तववादी सिनेमांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक मधूर भांडारकर यांनी नुकताच बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू' जॉइन केला आहे. आजवर अनेक हिट सिनेमे दिलेले लोकप्रिय दिग्दर्शक भांडारकर असंख्य सन्मानांनाही पात्र ठरलेले आहेत. 'कू' देत असलेल्या बहुभाषिक सुविधांचा प्रभावी उपयोग करून भांडारकर भारतीय युजर्सशी कनेक्ट होतील. आपल्या सिनेजगतातल्या कामगिरीसह आगामी रंजक प्रकल्पांबाबतची माहितीही ते चाहत्यांशी आवर्जून शेअर करतील. 'कू' जॉइन केल्यानंतरचा आनंद व्यक्त करण्यासाठी भांडारकर यांनी खास पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, "हॅलो इंडिया, आता मी दाखल झालोय भारताचे आपले खास अॅप असलेल्या 'कू' वर. तुम्ही मला @imbhandarkar वर फॉलो करू शकता. इथे माझे आगामी चित्रपट, भटकंतीचे कथा-किस्से आणि अध्यात्मिक प्रवासाबाबत जाणून घेऊ शकता." यासह भांडारकर यांनी एक 14 सेकंदांचा व्हीडिओही पोस्ट केला आहे. यात ते एका हिरव्यागार शेताच्या कडेने चालताना दिसत आहे. व्हीडिओत 'अभी कुछ दिनों से लग रहा है बदले बदले से हम है...' या सुंदर गाण्याची धुन पार्श्वसंगीत म्हणून वाजताना ऐकू येते.
सोबतच आज भांडारकर यांनी आज 'कू'वर एक घोषणाही केली आहे. त्यात ते म्हणतात, 'बबली बाउन्सर'चे पहिले मॅरेथॉन शूट नुकतेच पंजाब आणि दिल्लीत पूर्ण केले. हा एक कमालीचे समाधान देणारा अनुभव होता. माझे सहकारी असलेले अभिनेते आणि तंत्रज्ञांना खूप धन्यवाद!'
या पोस्टमध्ये भांडारकर यांच्यासोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसते आहे. तमन्ना 'बबली बाऊन्सर' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा एका महिला बाउन्सरच्या आयुष्याची काल्पनिक पण उर्जावान कथा सांगतो. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि जंगली पिक्चर्सची ही संयुक्त निर्मिती असणार आहे.