KBC Marathi स्पर्धकांना वैयक्तिक मुलाखतीसाठी फोन कॉल सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ मार्च २०२२

KBC Marathi स्पर्धकांना वैयक्तिक मुलाखतीसाठी फोन कॉल सुरु

कोण होणार करोडपती | वैयक्तिक मुलाखती ३१ मार्चपासून । KBC Marathi Kon Honaar Crorepati


ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व लवकरच सुरू होणार आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. 


गेल्या  पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. प्रत्येक खेळात कोणी  जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं  सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


23 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 दरम्यान 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठीच्या नावनोंदणीला करण्यात आली. ज्या इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली होती, त्यातील पात्र व्यक्तीची 16 मार्च 2022 रोजी ११ वाजता ऑनलाईन ऑडीशन घेण्यात आली . त्यात २० प्रश्न विचारण्यात आले. आणि चार व्हिडीओ प्रश्न विचारण्यात आले. 

कोण होणार करोडपती नोंदणीसाठी विचारलेले २० प्रश्न | KBC Marathi


करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे. ऑनलाईन ऑडीशनमध्ये यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना कोण होणार करोडपती फोन कॉल करण्यात येत आहेत. हे कॉल आल्यावर यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना वैयक्तिक मुलाखतीसाठी (kon honar marathi karodpati 2022 personal interview) ३१ मार्चपासून ७ एप्रिल 2022पर्यंत  वेळापत्रक देण्यात येत आहे. दरम्यान, यात Kon Honaar Crorepati | Khc Personal Interview  साठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांना २६ मार्चपासून  KBC Marathi कडून फोन करण्यात येत आहेत. 


या संदर्भात काही युट्युबरने प्रसारित केलेले व्हिडीओ ------------------------------------------------------------------------

  • Kon Honaar Crorepati 2022 registration number
  • KBC Marathi 2022 start Date
  • Kon Banega karodpati Marathi 2022 registration number
  • Sony Marathi KBC Registration 2022
  • Kon hoil Marathi Crorepati 2022 registration number
  • Kbc marathi 2022 helpline number
  • Kon honaar crorepati 2022 terms and conditions
  • Kbc marathi registration 2022 number