२१ मार्च २०२२
Home
Unlabelled
JantaKiKavita: जागतिक कविता दिनी पीयूष मिश्रा यांनी Koo App वर सुरू केले खास अभियान
JantaKiKavita: जागतिक कविता दिनी पीयूष मिश्रा यांनी Koo App वर सुरू केले खास अभियान
भारतीय सोशल मीडिया मंचाने प्रख्यात बॉलीवुड सेलेब्स आणि काव्यप्रेमींना केले आकर्षित
राष्ट्रीय, 21 मार्च 2022: जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून सोमवारी प्रख्यात अभिनेता आणि कवी पीयूष मिश्राने देशातला पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo App वर #JantaKiKavita (जनता की कविता) नावाचे एक अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत पीयूष मिश्राने दोन ओळींसह एका कवितेची सुरवात केली आणि युजर्ससोबत Koo वर असलेल्या कवींना यात आणखी ओळी जोडत एक सुरेख कविता बनवण्याचे आवाहन केले आहे. 19 मार्चला "#JantaKiKavita" हॅशटॅगसह लॉन्च केलेल्या या अभियानाचा उद्देश आहे अधिकाधिक युजर्सशी जोडून घेत विचारांचा एक छान धागा विणणे.
एक लेखक, कवी, गीतकार, गायक आणि संगीतकाराच्या रूपात ओळखले जाणारे पीयूष मिश्रा यांनी आपल्या आधिकृत हॅंडलवरून एक 'कू' पोस्ट करत अभियान सुरू केले. ही पोस्ट होती, “बिना शक्कर की थी चाय मेरी,
तुमने मुस्कुरा भर दिया, तो मीठी हो गई
इस कविता को आगे बढ़ाने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा @shambhushikhar @anamikaamber और कू पर जुड़े सभी कवि और कवयित्रियों को। कल विश्व कविता दिवस पर Koo ने की है सबसे बड़ी कविता लिखने की पहल। इस कविता में अपनी पंक्तियां जोड़िए और आगे लोगों को टैग करते जाइए #JantaKiKavita के साथ।”
https://www.kooapp.com/koo/itspiyushmishra/0bb49647-e914-42d2-937f-c1936c1cb1ae
खरेतर, कू अॅपवर ‘कविता’ सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या कम्यूनिटीजपैकी आहे. कवींचा एक मोठा गट असा आहे, जो हिंदी भाषेत लिहीतो आणि कू करतो. या अभियानाचा उद्देश प्रतिभावंत लोक आणि तरुण कवींना दर्जेदार कवितांसह समोर येण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या अभियानांतर्गत आधीच विशेषकरून प्रादेशिक कवींमध्ये एक उत्साह पहायला मिळाला, विविध विषयांवर आपल्या मूळ भाषेत स्वत:ला व्यक्त करत राहतात.
https://www.kooapp.com/koo/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE/0aa33704-d426-4dec-8a82-7f8c32540686
https://www.kooapp.com/koo/poornaviram/841c835c-12d7-4533-9990-e69179d38dbf
https://www.kooapp.com/koo/pranjoyy/75506c6b-11e8-45bd-8f01-58d1bb420d9a
'कू'च्या या पुढाकारात प्रवीण डबास, रागिनी खन्ना आणि सौंदर्या शर्मासारखे बॉलीवुडचे इतरही सेलेब्ज सहभागी झाले. या सगळ्यांनी अतिशय उत्साहात भाग घेत आपापल्या कविता चाहत्यांसमोर ठेवल्या.
https://www.kooapp.com/koo/raginikhanna/130dfead-69c3-4ee4-94ed-494244d5ceba
https://www.kooapp.com/koo/dabas/c08179f1-017c-4b66-b501-6ce87b5a082f
https://www.kooapp.com/koo/soundaryasharma/6c3feb3a-fac9-49e8-8f60-9292a61a9f14
'कू' भारताचा एकमेव बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, जो यूजर्सना त्यांच्या आवडीच्या भाषेत आपले विचार व्यक्त करण्यासाठी सक्षम बनवतो. हा मंच प्रादेशिक कलाकार, कवी, राजकीय नेते आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यास सतत तत्पर असतो. हे विशेषत: असे कलाकार असतात, ज्यांना इतर सोशल मंचांवर त्यांचा अवकाश मिळत नाही.
"कू' त्या लोकांना एक मंच देत भारताचे व्यापक लोकजीवन आणि भाषिक विविधतेचे एक उदाहरणही देतो. भारतात असे लोक बहुसंख्य आहेत जे आपल्या मातृभाषेत विचार व्यक्त करणे व बोलणे पसंत करतात.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
