०९ मार्च २०२२
ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर द्वारा जागतिक महिला दिन साजरा
ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर द्वारा देवाडा स्थित डेबु सावली वृध्दाश्रम येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.अल्काताई मोटघरे अध्यक्ष ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर,प्रमुख पाहुणे म्हणुन मान. सुभाष भाऊ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ भारतीताई शिंदे होते.. सत्कारमूर्ती मान. कुसुमताई भिमराज गजभिये , डॉक्टर सुषमा लिडर (उसरे), मान.सुमित्राताई आवळे यांचा जिवनदान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले...मान.कुसुमताई यांनी आपल्या पतीचे मरणोत्तर अवयव दान करून तीन लोकांना जिवनदान दिले आहे.
मान. डॉक्टर सुषमा लिडर उसरे यांनी अगदी सिरोंचा येथिल अतिदुर्गम भागात जाऊन लॉक डाऊन च्या काळात कोविड च्या भयावह परिस्थितीत आपल्या कर्तव्याचे पालन करून गरोदर स्त्रिया,वयस्कर रोगी, लहान मुले यांचे जीव वाचविले आणि त्यांच्यात अवरेनेस जागृत केले. मान.सुमित्राताई आवळे यांनी अनेक वृद्धांची सेवा करत प्राण वाचविण्याची पराकाष्ठा केली.. एकंदरीत तीनही महिलांचे कार्य हे जीवनदान देण्यात अतिशय सहाय्यक ठरले.. अशा व्यक्तींचा जागतिक महिला दिनाच्या दिवशी सत्कार करून एक आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम डेबु सावली वृध्दाश्रम, देवाडा येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर चे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दुषंत नगराळे यांनी केले.. यावेळी डेबु सावली वृध्दाश्रम संपूर्ण परिवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिकेत दुर्गे यांनी केले. यानंतर ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर कडून स्नेहभोजन देण्यात आले.
International Women's Day celebrated by Blue Mission Multipurpose Public Trust Chandrapur
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
