.... असा पार पडला आझाद बागेचा उद्घाटन सोहळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ मार्च २०२२

.... असा पार पडला आझाद बागेचा उद्घाटन सोहळा

शहरातील आझाद बागेचे थाटात उद्घाटन; विविध कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार
चंद्रपूर शहराचे हृदयस्थळ असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी रात्री पार पडला.
उदघाटन लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या चित्राचे अनावरण केले. त्यानंतर रिमोट दाबून एलईडीचे द्वार उघडून बगीचा त प्रवेश करण्यात आला. बागेत योगनृत्य, स्केटिंग, महाराष्ट्र संगीत, आदिवासी नृत्य, महात्मा ज्योतिबा फुले यांचे एकपात्री प्रयोग आणि विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमात बगीचा त दररोज नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंच, योग परिवार, बगीचा मित्र परिवार आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा बघण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Inauguration Ceremony of Azad Bagh