१७ मार्च २०२२
जुन्नरमध्ये लतादीदिंना त्यांच्या लोकप्रिय गीतांनी स्वरांजली
जुन्नरमध्ये लतादीदिंना त्यांच्या लोकप्रिय गीतांनी स्वरांजली
जुन्नर /आनंद कांबळे
भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या जुन्नरच्या कलोपासक या संस्थेने त्यांच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम आयोजित केला. पुणे येथील संदीप पंचवटकर व सहकाऱ्यांनी लतादीदींच्या आठवणींना ' लतायुग ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उजाळा दिला. उपस्थित संगीत रसीक स्वरांच्या वर्षावात न्हाऊन गेले. अशी माहिती स्वागताध्यक्ष विनायक कर्पे व संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सावंत यांनी दिली. कलोपासकच्या मावळत्या अध्यक्षा वैशाली सावंत यांनी निवनियुक्त अध्यक्षा मनीषा कोरे यांच्याकडे पदभार दिला. उद्योजक रमेश जुन्नरकर, पु. ना. गाडगीळ समूहाचे सतीश कुबेर, डॉ. संदीप डोळे, पुणे मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, कलो पासक संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश भोसले, सचिव शरद रेळेकर, संचालक प्रमिला जुन्नरकर , चंद्रशेखर गाजरे , वैभव मलठणकर , धनराज खोत, विश्राम आकडमल, धर्मेंद्र कोरे,नितीन ससाणे , रमेश ढोमसे , स्वाती भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
In Junnar, Latadidin was enchanted by his popular songs
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
