HarRangKiHoli: भारतीयांना आपापल्या शैलीत आनंदाचे रंग उधळायला प्रेरित करते Koo App चे होळी गीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ मार्च २०२२

HarRangKiHoli: भारतीयांना आपापल्या शैलीत आनंदाचे रंग उधळायला प्रेरित करते Koo App चे होळी गीत


#HarRangKiHoli: भारतीयांना आपापल्या शैलीत आनंदाचे रंग उधळायला प्रेरित करते Koo App चे होळी गीत

मागची दोन वर्षं शांततेत हा उत्सव साजरा केल्यानंतर #HarRangKiHoli विशेष रूपात महत्त्वाची आहे कारण यंदा होळी अतिशय उत्साहात खेळली जाणार आहे.
कू होळी गीत कंपोज केले आहे सिद्धार्थ सक्सेना आणि चंदन जायसवाल यांनी. गायले आहे चंदन जायसवालने तर स्वप्निल तारेने संगीत दिले आहे. गाणे लिहिले आहे ऋचा ढोलीने.

राष्ट्रीय, 16 मार्च 2022: होळीच्या प्रसंगी देशाचा पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू ॲपने एक जोरदार होळी गीत- #HarRangKiHoli लॉन्च केले आहे. याचा उद्देश आहे, की यंदा भारतीयांनी आपल्या खास परंपरा दाखवत रंगांचा उत्सव आपल्या शैलीत साजरा करावा. #HarRangKiHoli- प्रख्यात-प्रभावी लोक आणि सेलेब्जच्या माध्यमातून सगळ्या भारतातून सांस्कृतिक विविधता आणि परंपरांना एकत्र आणते. यात रंग आणि काठीचा वापर करत खेळल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या लट्ठमार होळीची झलक, लोकनृत्य आणि मार्शल आर्टला एकत्र आणणारा पंजाबचा होला मोहल्ला, स्थानिक लोकांकडून वसंताच्या स्वागतासाठी मनवला जाणारा गोव्याचा जिवंत शिमगो, भगवान कृष्णाच्या भव्य जुलूसचे दर्शन घडवणारी पश्चिम बंगालची डोल जात्रा असे अनेक रंग आहेत. हे गीत 'अनेक संस्कृती, एक भावना' या संकल्पनेचे उत्कृष्ट दर्शन घडवते. 

हे गीत भारतीयांना निमंत्रण देते, त्या सर्व सुंदर पद्धतींचे दर्शन घडवण्यास, ज्यातून ते एकच सण विविध पद्धतींनी साजरा करतात. कू ॲपवर यूजर्स- #Milerangmeratumhara (#मिले_रंग_मेरा_तुम्हारा) #SabkiBoliHappyHoli (#सबकी_बोली_हॅप्पी_होली) #IndiaKiHoli (#इंडिया_की_होली) अशा हॅशटॅग्जच्या माध्यमातून व्हीडियो आणि छायाचित्रे शेयर करत आहेत. यातून त्यांचे रीतीरिवाज, मिष्टान्नं, व्यंजनं आणि परंपरा प्रभावीपणे समोर येते.

यासंदर्भात कू ॲपचे प्रवक्ता म्हणाले, "आमचा मंच अशा प्रत्येक गोष्टीला अभिवादन करतो, जी भारतात साजरी केली जाते. तो खेळ असो, निवडणूक असो, चित्रपट असो की सण-उत्सव. होळी भारताच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. हरेक राज्यात होळी विविध प्रकारे साजरी केली जाते. 2022 यासाठी खास आहे, कारण लोकांनी आता लसीकरण करून घेतले आहे आणि लोक दोन वर्षांनी अतिशय उत्साहात होळी खेळायला तयार आहेत. आपल्या मूळ भाषेत लोकांना व्यक्त होण्याचा अधिकार देणारा एक मंच म्हणून कू ॲप- #HarRangKiHoli च्या माध्यमातून भारताचा उत्सवी माहोल समोर आणण्यासाठी अगदी तयार आहे. आम्ही सगळ्यांना मंचावर येण्यास, आपल्या होळीच्या परंपरा इतरांना सांगण्यास आणि समविचार लोकांशी संवाद साधण्यास आमंत्रित करत आहोत. तुम्हा सगळ्यांना सुरक्षित आणि आनंदी होळीच्या सदिच्छा!”