चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० मार्च २०२२

चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन

एस .आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क द्वारा चक निंबाळा या गावात आयोजित ग्रामीण समाज कार्य शिबिरात जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर जिल्हा संघटक, अनिल दहागावकर ,जिल्हा सचिव, धनंजय तावाडे यांनी चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन केले .विद्यार्थी व गावकर्‍यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिताताई पिदुरकर होत्या. तर पोलीस पाटील सौ किरण राजूरकर ,शिबिर संयोजक प्रा. डॉ. कल्पना कवाडे, प्रा. डॉ. संतोष आडे ,प्रा. डॉ. किरण मनुरे  झेप व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक  तुळशीदास सहारे ,दिनेश कष्टी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

Guide students and villagers through miracle debriefing demonstrations