भद्रावती येथे जागतिक ग्राहक दिन थाटात संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ मार्च २०२२

भद्रावती येथे जागतिक ग्राहक दिन थाटात संपन्न


*ग्राहक पंचायत चळवळीचे कार्य प्रेरणादायी - न्यायाधीश अतुल अळशी

*शेकडो ग्राहकांनी घेतला कार्यशाळेचा लाभ

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून दिनांक १३ मार्च २०२२ रोज रविवारला ग्राहकांना जागृत करण्यासाठी, ग्राहकांचे हक्क समजून सांगण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी जागतिक ग्राहक दिनी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

ग्राहक पंचायत भद्रावती कडून माननीय न्यायाधीश अतुल अळशी, डॉक्टर नारायण मेहरे, डॉक्टर नामदेव उमाटे, श्रीमती कीर्ती गाडगीळकर, वैशाली बोरकर यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक माननीय न्यायाधीश अतुल अळशी, ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा चंद्रपूर यांची उपस्थिती होती. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ ज्याच्यावर ग्राहक तक्रार निवारण आयोग चालते तो शेवटी असतो, प्रथम ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांचे चळवळीतून ग्राहक जागृती होत असून ग्राहकांना कायद्याचे मूलभूत माहितीचे संरक्षण हक्काबाबत सहायता लाभत असते, त्यामुळे ग्राहक पंचायतीचे कार्य हे प्रेरणादायी असुन ही चळवळ अधिक गतिमान करण्यास नागरीकांनी सक्रिय सहभाग योगदान द्यावे. असे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण आयोग चंद्रपूर चे अध्यक्ष तथा न्यायाधीश अतुल अळशी यांनी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळा प्रसंगी भद्रावती येथे केले. साहेबांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याबद्दल जमलेल्या सर्व नागरिकांना माहिती दिली. ग्राहकांचे अधिकार, फसवणूक झाल्यास तक्रार कोठे आणि कशी द्यायची याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉ. नारायण मेहरे, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत यांनी ग्राहक पंचायती चा इतिहास, ग्राहक पंचायतीची निर्मिती, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक पंचायतीची भूमिका आणि ग्राहक पंचायतीचे निर्माता माननीय स्वर्गीय बिंदुमाधव जोशी साहेब यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ग्राहकांनी स्वतः जागृत राहून स्वयम् लढा देण्याकरिता तयार करण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले पाहिजे तसेच शेतकरी बांधवांच्या अनेक प्रश्नांकडे लक्ष देऊन शोषणमुक्त समाज तयार करावा असे त्यांनी सांगितले.

ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती कीर्ती गाळगीडकर यांनी ऑनलाइन होणारी फसवणूक यावर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या कंपनीतून ऑनलाईन वस्तू विकत घेताना काय काळजी घ्यावी आणि फसवणूक झालीच तर दाद कुठे आणि कशी मागायची याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नामदेव उमाटे साहेब यांनी ग्राहक पंचायत भद्रावतीच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी ग्राहक पंचायत भद्रावती ला नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे अनेक लोक हिताचे कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे या विद्यालयाला लोक विद्यालय असे डॉक्टर नामदेव उमाटे यांनी संबोधिले. तसेच विवेकानंद महाविद्यालय येथे कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिकांचे, पाहुण्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. ग्राहक पंचायत भद्रावती चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी भद्रावती ग्राहक पंचायतीच्या केलेल्या कार्याची माहिती दिली. ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम मते यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक पंचायत च्या कार्याची सविस्तर माहिती दिली. सहारा क्रेडिट सोसायटीच्या आलेल्या जनसमुदायाला प्रविण चिमुरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करत तक्रार कशी दाखल करायची, कागदपत्रे आणि उपस्थित ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. सुदर्शन तनगूलवार यांनी आभार प्रदर्शन केले. तर कार्यक्रमाचे संचालन सदानंद आगबत्तनवार अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चंदनखेडा यांनी केले.

जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वामन नामपल्लीवार, पुरुषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर, मोहन मारगोनवार, तामगाडगे, गुलाब लोणारे, सुदर्शन तनगूलवार, मोहनिश नगराळे, प्रमोद भोयर, प्रशांत चिलबुले तसेच विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे डॉ. रमेश पारेलवार, कल्याणी लेडांगे, सुषमा बावणे, वामण अंड्रस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.