३० मार्च २०२२
डिजिटल पत्रकारांचे गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा) गठीत
गामा च्या संयोजकपदी मनिष कासर्लावार, अनिल बोदलकर यांची निवड
गडचिरोली आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मिडीयाचे महत्व मोठया प्रमाणात वाढले आहे. मागील दोन वर्षातील कोरोना काळापासून तर डिजिटल मिडीया हा प्रसार माध्यमाचा महत्वपुर्ण भाग बनला आहे. कोणत्याही घडामोडीचा वृत्तांत काही क्षणात जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून केले जात आहे.
गडचिरोली जिल्हयात सुध्दा डिजिटल मिडीयाचा सुध्दा प्रसार वाढला असून या मिडीयामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांचे गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन (गामा) गठीत करण्यात आले असून या असोसिएशनच्या संयोजकपदी मनिष कासर्लावार व अनिल बोदलकर यांची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार आणि एव्हीबी न्यूज पोर्टलचे संपादक अनिल बोदलकर यांची गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनच्या संयोजकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन मध्ये पुर्णसत्य न्यूज पोर्टलचे संपादक हेमंत डोर्लीकर, गडचिरोली वार्ताचे संपादक जयंत निमगडे, महाभारत न्युज पोर्टलचे संपादक उदय धकाते, गोंडवाना टाईम्स पोर्टलचे व्यंकटेश दुडंमवार, महाराष्ट टुडेचे संपादक जगदिश कन्नाके, राईट टाईम न्यूजचे संपादक राजू सहारे, नॅशनल मिडीया न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रा.श्रीमंत सुरपाम, विदर्भक्रांती न्यूज पोटर्लचे संपादक बाळू म्हशाखेत्री, वृत्तवाणीचे संपादक प्रविण चन्नावार आणि नागपूर पोस्ट च्या प्रतिनिधी रूपाली शेळके यांचा समावेश आहे.
डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजनाबाबत गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशनचे संयोजक मनिष कासर्लावार 9423669220 व अनिल बोदलकर यांच्याशी 78210 93027 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
# गडचिरोली
# Digital Media

About खबरबात
Digital Media
चंद्रपूर, नागपूर
गडचिरोली,
Digital Media
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
