एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडेला चंद्रपूर येथे आईला भेटण्यास परवानगी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मार्च २०२२

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडेला चंद्रपूर येथे आईला भेटण्यास परवानगी

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडेला चंद्रपूर येथे आईला भेटण्यास परवानगी


एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे (Dr. Anand Teltumbde) यांना त्यांच्या वृद्ध आईला भेटण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यांना 8 आणि 9 मार्च रोजी आईला चंद्रपूर येथे भेट घेण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिली आहे. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहेत. . एस्कॉर्ट संरक्षणाखाली 8 ते 11 मार्च दरम्यान चंद्रपूर येथे त्यांच्या 92 वर्षीय आईला भेटण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली आहे. मात्र तेलतुंबडे यांना 11 मार्चला तळोजा तुरुंगात परत आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ह्या भेटीसाठी येण्याचा-जाण्याचा सर्व खर्च तेलतुंबडे यांना स्वत: करावा लागणार आहे, मात्र पोलीस सुरक्षेबाबतचा खर्च राज्य सरकारला करण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला निर्देश दिले आहेत.