०७ मार्च २०२२
जळगावच्या देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला शासनाची मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव : येथील शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित श्री गुलाबराव देवकर नर्सिंग कॉलेजमध्ये सन 2021 - 22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे.
देवकर बीएससी नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी साठ जागांवर प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ हा उच्चशिक्षित असून, महाविद्यालयासाठी अद्ययावत सुविधा आणि इमारत संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
*
प्रवेशासाठी पात्रता*
* बारावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी व इंग्लिश या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
*विद्यार्थ्याला किमान 45% गुण असणे आवश्यक. आरक्षित प्रवर्गासाठी 40 % गुण आवश्यक.
*नीट परीक्षा अॅपियर असणे आवश्यक.
*वयोमर्यादा किमान 17 वर्षे
खानदेशातील विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या शिक्षणासाठी ही मोठी संधी असून, प्रवेशासाठी *7620380833* या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
