नगरसेविका खुशबू चौधरी यांनी केले महानगरपालिका कार्यालयासमोर मडका फोडो आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ मार्च २०२२

नगरसेविका खुशबू चौधरी यांनी केले महानगरपालिका कार्यालयासमोर मडका फोडो आंदोलन

नगरसेविका खुशबू चौधरी यांनी केले महानगरपालिका कार्यालयासमोर मडका फोडो आंदोलनचंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत गुरुवारपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. आज सोमवारीदेखील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भिवापूर प्रभागातील (पठाणपुरा) नगरसेविका तथा झोन 2 च्या सभापती सौ. खुशबू अंकुश चौधरी यांनी सोमवार, दिनांक 28 मार्च रोजी महानगरपालिका कार्यालयासमोर मडका फोडो आंदोलन केले.
चंद्रपूर शहरात इरई धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात गुरुवारी पाईपलाईन फुटली. तेव्हा दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली होती. चार दिवस होऊही पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे चंद्रपूरकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
भिवापूर प्रभाग 14 (पठाणपुरा) नगरसेविका तथा झोनच्या सभापती   सौ. खुशबू अंकुश चौधरी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, उषा वाघमारे यांच्या उपस्थितीत पठाणपुरा येथील महिलांनी आंदोलन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. 5 दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी खुशबू चौधरी यांनी केली आहे.