मनपाच्या शाळेत शिक्षकांसाठी शाळा पूर्वतयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ मार्च २०२२

मनपाच्या शाळेत शिक्षकांसाठी शाळा पूर्वतयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण |शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांचे शाळा पूर्वतयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण महाकाली कन्या प्राथमिक शाळा येथे पार पडले. 


प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जेष्ठ अधिव्याख्याता प्रा. विनोद लवांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत  होते. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. 

पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचे शैक्षणिक, गुणवत्ता व शालेय शैक्षणिक वातावरण आनंददायी करून कार्य करताना उत्साही वातावरण कशा प्रकारे ठेवायचे, याची माहितीती प्रशिक्षणात देण्यात आली. या प्रशिक्षणाला सुलभक म्हणून सौ. लता कुमरे. संदिप जवादवार यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. 


कार्यक्रमाचे संचालन व तांत्रिक नियोजन भूषण बुरटे यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी श्री. मधुकर मडावी, आनंद गेडाम, राजकुमार केसकर, मेघशाम दैवलकर, परिणय रासेकर यांनी सहकार्य केले. 


Cmc Chandrapur Education