सोमवारीदेखील चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा होणार नाही | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ मार्च २०२२

सोमवारीदेखील चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा होणार नाही |

इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन पुन्हा सिटीपिएसच्या पाईपलाईन कामामुळे लिकेज झालेली आहे. त्यामुळे सोमवारी ईरई धरणावरुन होणारा पाणीपुरवठा शहरात होऊ शकणार नाही, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेने रविवारी रात्री उशिरा दिली.


शहरात इरई धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात गुरुवारी पाईपलाईनच्या कामामुळे लिकेज झाले. तेव्हा दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले होते. मात्र, दुरुस्ती पूर्ण होऊ न शकल्याने सोमवार, दिनांक २८ मार्च रोजी देखील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती मनपाने दिली आहे.Chandrapur CMC WAter