प्रियदर्शिनी चौकातील उड्डाणपुलावर दोन कारची सामोरा-समोर धडक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ मार्च २०२२

प्रियदर्शिनी चौकातील उड्डाणपुलावर दोन कारची सामोरा-समोर धडक

चौकातील वाहतूक व्यवस्था एक तास विस्कळीतचंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील प्रियदर्शिनी चौकातील उड्डाणपुलावर आज दिनांक ३ मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दोन कारची सामोरा-समोर धडक झाली. अपघाताने चौकातील वाहतूक व्यवस्था एक तास विस्कळीत झाली. दोन्ही चारचाकी वाहन आपल्या दिशेने जात असताना उड्डाणपुलावर नीयंत्रण सुटल्याने एकमेकांवर जाऊन आदळल्या. यात दोन्ही वाहनांचे लाखोचे नुकसान झाले आहे. अपघाताने काही वेळ चौकातील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलीसांनी दोन्ही वाहने रसत्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करत मार्ग पूर्ववत सुरू केला. दोन्ही वाहनमालकांनी वतीने रामनगर पोलीस ठाण्यात एकमेकांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.