आजच्या काळात पितृसत्ताक समाजव्यवस्था मागे पडत आहे, ही आनंदाची बाब आहे. -उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ मार्च २०२२

आजच्या काळात पितृसत्ताक समाजव्यवस्था मागे पडत आहे, ही आनंदाची बाब आहे. -उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर.


नवेगावबांध येथे दोन दिवसीय जागतिक महिला दिन संपन्न.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.९ मार्च:-
मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे बाळकडू पाजले, त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची सकाळ आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या मातांनी, आपल्या मुली शिकल्या पाहिजेत, त्यांना विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, मोकळेपणाने त्यांना वावरता आले पाहिजे, अशी कामना मनात ठेवावी. २०१२ चे लंडन, २०१६ चे रियो ऑलम्पिक स्पर्धा महिलांनी सर्वाधिक पदके आणून गाजविले होते. आजच्या काळात पितृसत्ताक समाजव्यवस्था मागे पडत आहे, मुलींना,स्त्रियांना पुढचे स्थान मिळत आहे. ही अभिमानाची व आनंदाची बाब आहे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर देवरी यांनी केले. ते येथील ग्रामपंचायत परिसरात दिनांक ८ मार्च रोज मंगळवार ला सकाळी ११.३० वाजता आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
येथील ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत संविधान ,सत्यम, जिजाऊ, जय हिंद, तरंग ग्रामसंघ तसेच स्थानिक ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे दिनांक ७ व ८ मार्च ला मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गाहणे यांच्या अध्यक्षतेखाली, कार्यक्रमाचे उद्घाटन अनिरुद्ध शहारे सरपंच यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. खंडविकास अधिकारी विलास निमजे,ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर,मंडळ कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर,बँक व्यवस्थापक मानवटकर,ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण,पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, मनीषा तरोणे , उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ,शितल राऊत, लीला सांगोळकर,सविता बडोली, लता आगाशे, डॉ.लता लांजेवार, ग्राम संघाचे अध्यक्ष भिमाबाई शहारे सुनिता डोंगरवार ,अनिशा पठाण, शीला सांगोळकर, रेखा काशीवार, विशाखा साखरे,वैशाली बोरकर,राऊत गुरुजी, गुनिता डोंगरवार अर्चना पंधरे, जासुबाई कापगते, भास्कर बडोले पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिनांक ७ मार्च रोज सोमवार ला सकाळी ८.३० वाजता ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.तर ८ मार्च रोज मंगळवारला जागतिक महिला दिनाच्या निमित्त गावातील सर्व ग्रामसंघ व त्या अंतर्गत येणार्‍या महिला बचत गटांच्या वतीने सकाळी ८.३० वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता येथील ग्रामपंचायत परिसरात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. गावातील विविध ग्रामसंघ व महिला बचत गटाच्या महिलांनी नृत्य, एकांकिका, दांडिया नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी उपस्थितांना दिली.या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला सर्व ग्राम संघाचे कॅडर, पदाधिकारी, सदस्य तसेच समस्त महिला गटांच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच ग्रामस्थ महिलांनी बहुसंख्येने सहभाग दर्शवला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान ग्राम संघाचे अध्यक्ष भिमाबाई शहारे यांनी मांडले, तर कार्यक्रमाचे संचालन रूपाली चाचेरे यांनी केले.उपस्थितांचे आभार माया भैसारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्यामकला औरासे, आचल शहारे यांच्यासह ग्राम संघाचे कॅडर, सर्व पदाधिकारी,ग्रामसंघ, सर्व महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.