#अप्रतिम_बांबू_कलाकार मिनाक्षी वाळके - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मार्च २०२२

#अप्रतिम_बांबू_कलाकार मिनाक्षी वाळके #वाढदिवस_उद्योजिकेचा

#उद्योजकतेचा_जागर घालणाऱ्या मराठी उद्योजकांचा शोध घेतांना अनेक #अनमोल_हिरे हाताला गवसत आहेत. जवळपास शून्य भांडवलात आणि अतिशय कठिण परिस्थितीत अनेकांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असामान्य कर्तृत्व गाजवले आहे.
#सौ_मिनाक्षी_वाळके या त्यातल्याच एक #उद्योगिनी. #चंद्रपूर सारख्या भागातून आपल्या कलात्मक सर्जनशीलतेने अवघ्या 3 वर्षात परदेशात डंका पिटणारी ही तरुणी. #अप्रतिम_बांबू_कलाकारी दाखवत मिनाक्षी वाळके यांनी देश विदेशातील लोकांना थक्क करून सोडले आहे.
2019 मध्ये झालेल्या #मिस_क्लायमेट या जागतिक सौंदर्य स्पर्धेसाठी चा मुकुट (Crown) बनवून देण्याचं #सौभाग्य मिनाक्षी वाळके यांना लाभले. युनायटेड नेशन समिट व ग्लोबल इनोव्हेटिव्ह एक्सचेंज यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत मिनाक्षी ताई यांनी बनवलेला #बांबूचा_क्राऊन हा सर्वांचं आकर्षण होता.
#बांबूच्या_राख्या हे मिनाक्षी ताईंचं खास वैशिष्ट्य. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान यांनी हाती मिरवलेली ही राखी आता थेट परदेशात पोहोचली आहे. #रक्षाबंधन साठी 50 हजार राख्या बनवण्याचं #शिवधनुष्य त्यांनीउचललं आणि इंग्लंड, स्वित्झर्लंड, कॅनडा आणि स्वीडन या देशात त्या पोहोचवल्या पण.
#बांबूवर_QR_कोड बनवण्यात मिनाक्षी ताई यशस्वी झाल्या असून 100 हून अधिक आस्थापनांनी मिनाक्षी ताईंकडून बांबूवर QR कोड तयार करुन घेतले आहेत.
#मिनाक्षी_वाळके यांचा हा प्रवास खूपच आव्हानात्मक आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील मिनाक्षी ताईंनी आपल्या जिद्दीच्या जोरावर ही भरारी घेतली आहे. #इंजिनीयर व्हायचं स्वप्न बाळगलेल्या मिनाक्षी ताईंना 12 वी नंतर शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. #नागभिड तालुक्यातील #सावरगाव येथील मिनाक्षी ताई लग्नानंतर चंद्रपूर येथे आल्या. संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांनी हस्तकलेच्या वस्तू बनवायला सुरूवात केली. हे करतांना त्याचं लक्ष बांबू कडे गेलं आणि बांबू कारागिरीचं रितसर प्रशिक्षण घेत त्यांनी या व्यवसायात बस्तान बसवलं. त्यांच्या #अभिसार_इनोव्हेटिव्ह या उद्योगाद्वारे आज अप्रतिम अशा कलाकुसरीचे प्रॉडक्ट तयार होत आहेत.
मिनाक्षी वाळके यांचे हे कला कौशल्य अनेकांनी नावाजले असून जागतिक स्तरावर त्याचे कौतुक होत आहे. #इस्त्राईल देशातील #जेरुसलेम येथे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी मिनाक्षी ताई यांना पाचारण करण्यात आले होते. राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार, टॉप 20 स्टार्ट अप पुरस्कार, लोकसत्ता तरूण तेजाकिंत पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

#मिनाक्षी_ताई_वाळके यांचे
अभिनंदन
आणि #वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा !सौ. मिनाक्षी वाळके
अभिसार इनोव्हेटिव्ह
चंद्रपूर, महाराष्ट्र
मो. 7038666360