अखेर... त्या बिबट्याला आई पासून विभक्त झालेल्या बछड्याला मिळाली आई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ मार्च २०२२

अखेर... त्या बिबट्याला आई पासून विभक्त झालेल्या बछड्याला मिळाली आई

*आयुध निर्माणी येथील मेन बिल्डिंग परिसरात दोन दिवसांपूर्वी आढळेल होते बिबट्याच्ये पिल्लु

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

तब्बल दोन दिवसापासून आई पासून विभक्त झालेल्या बछड्याला आयुध निर्माणी जंगल परिसरात आई मिळाल्याने वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

आयुध निर्माणी येथील मेन बिल्डिंग परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या तीन महिन्याचा बछडा झाडावर असल्याची माहिती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी वन विभागाला दिली वनपरिक्षेत्र अधिकारी एच पी शेंडे यांनी घटनास्थळी जाऊन या बछड्याला ताब्यात घेतले त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जेवण पाणी दिले व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणी मध्ये ठेवले व त्याच्या आईचा या संपूर्ण परिसरात शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. त्यानंतर याच परिसरात कॅमेरे लावण्यात आले. त्या ठिकाणी कॅमेऱ्या मध्ये आई कैद झाली. याच परिसरात मंगळवारला मध्यरात्री बछड्याला पिंजऱ्यात कैद करून ठेवले होते त्याच परिसरात त्याची आई येतात त्याला मुक्त करण्यात आले व त्या बछड्याला आई मिळाल्याने वन कर्मचाऱ्यांमध्ये हास्य फुलले या स्टिंग ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी एचपी शेंडे, चकषेतरहन्द्रपुर् सहाय्यक हनवते, वैद्यकीय अधिकारी रोडे, वनरक्षक गेडाम वमजूर आदी उपस्थित होते.