अध्यात्मा बरोबरच आत्मोन्नती, ही काळाची गरज.- डॉ. अभिमन कापगते . सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे नवेगावबांध येथे आयोजन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ मार्च २०२२

अध्यात्मा बरोबरच आत्मोन्नती, ही काळाची गरज.- डॉ. अभिमन कापगते . सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे नवेगावबांध येथे आयोजन.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२३ मार्च:-
समाजामध्ये वाढत्या चंगळवादामुळे मानसिकता बदलत आहे. समाजात भेदभाव, व्यसनाधिनता, अशांतता पसरत आहे. जगाचे ज्ञान आहे, पण परिसराचे ज्ञान नाही. अशी आपली अवस्था झाली आहे. अध्यात्मा बरोबरच आत्मोन्नती ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. अभिमन कापगते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
 ते जल साक्षरता दिनानिमित्त आयोजित संत चोखामेळा पुरस्कार विजेते, राष्ट्रीय प्रबोधनकार ,कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन बीएडी विद्यालयाच्या प्रांगणात दि.२२ मार्च रोज मंगळवार ला रात्री ८.०० वाजता आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या जाहीर कीर्तनाचे आयोजन  ग्रामस्थ, तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले होते.
राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री            कार्यक्रमाचे उद्घाटन राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते  संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार व दीप प्रज्वलित करून अभिवादन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभिमान कापगते हे होते. तर अतिथी म्हणून शारदाताई राजकुमार बडोले, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, रचनाताई गहाणे, डॉ. भुमेश्वर पटले, चेतन वडगाये, शालिंद्र कापगते, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, जीवन लंजे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, विजयाताई कापगते,विशाखा साखरे, नितीन पुगलिया, संजीव बडोले, रामदास बोरकर,सतीश कोसरकर, अमृतलाल टाक, मूलचंद गुप्ता, महादेव बोरकर, खुशाल काशिवार, बबलू शिपानी,ग्रामपंचायत सदस्य रेशीम काशिवार शितल राऊत,गुनिता डोंगरवार, नवल चांडक, डॉ. देवाची कापगते, जगदीश पवार पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
नवेगावबांध येथील अनिल डोंगरवार हे एमपीएससी ची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा यशस्वी रीतीने उत्तीर्ण केल्याबद्दल, तसेच कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचा अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
महाराष्ट्रात संत,राष्ट्रपुरुष यांची परंपरा लाभली आहे. शूद्र अतिशूद्र यांना पाणी पिण्याच्या हक्कासाठी महाडच्या चवदार तळ्याचे सत्याग्रह झाले.समताधिष्ठित समाजरचना प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली.संत तुकाराम महाराज, संत रविदास, तथागत गौतम बुद्ध संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेची प्रबोधनाची परंपरा लाभली आहे. या सर्व विभूतींनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असे सांगून, समतावादी, समताधिष्ठित समाजरचनेची गरज संतांनी अधोरेखित केली. असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. नेत्रदान ,देहदान  करून समाजकार्याला हातभार लावा. तरुण पिढीने व्यसनाधीन ते पासून दूर राहावे. समाजातील गरजवंतांच्या मदतीला धावून जावे, समाजातील वाईट चालीरिती, व्यसनाधीनता, राष्ट्र व समाजासाठी स्वतःला झोकून देणे,याविषयी अनेक उदाहरणे देऊन माणसातच देव शोधावा.असे आवाहन सप्तखंजेरीवादक,कीर्तनकार, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या जाहीर कीर्तनातून केले . सत्यपाल महाराजांनी समाजातील दुखी, व्यसनाधीनतेमुळे झळ पोचलेल्या, इतरांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा साडी, पुस्तका देऊन यावेळी गौरव केला. रचनाताई गाहणे, लायकराम भेंडारकर यांचीही यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीएडी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रूपचंद काशीवार यांनी केले. कार्यक्रमाचे  संचालन अशोक परशुरामकर यांनी, तर उपस्थितांचे आभार सचिन सांगोळकर यांनी मानले. ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई सांगोळकर,लता आगाशे, दुर्गा मेश्राम, अनुसया नैताम, हर्षा बाळबुद्धे, अण्णा डोंगरवार, जितेंद्र कापगते, दिलीप पोवळे, संतोष नरुले, विलीन बडोले विलास कापगते यांच्यासह पाच हजार ग्रामस्थ किर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.