पाऊलझोला येथे ग्रामसभांचा अधिकार स्वाभिमान मेळावा संपन्न. - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शनिवार, मार्च ०५, २०२२

पाऊलझोला येथे ग्रामसभांचा अधिकार स्वाभिमान मेळावा संपन्न.

भुगर्भातील पाणी हे आमचे फिक्स डिपाझिट आहे.-अमित कळसकर, सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक.

संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.५ मार्च:-
आज हळु-हळु जमिनीतील जलस्तर खाली चालले. त्याचे पुनरभरन करण्याचे कार्य व्हायला पाहिजे. त्या करीता गावातील व जंगलातील तलाव, बंधारे, मजगी, शेततळे या सारखे कामे करणे गरजेचे आहे.  भुगर्भातील पाणी हे आमचे फिक्स डिपोझिट सारखे आहे  त्याचा योग्य वापर करुन गावात  निलक्रांती पुढिल ५ वर्षात यायला पाहिजे. त्या करीता वनहक्क प्राप्त गावांचा संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले. त्याची अंमलबजावणी करीता सर्व यंत्रणांनी ग्रामसभांना सहकार्य करावे. असे आवाहन कार्यक्रमाचे विषेश अतीथी  अमित एस. कळसकर, सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक, नागपुर यांनी केले.  
ते वनहक्क कायदा २००६ अन्वये वनांचे संरक्षण, संवर्धन व व्यवथापन करण्याचे हक्क तसेच गौण वन उपजावरील स्वामित्व अधिकार प्राप्त ग्रामसभांची सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितींचा अधिकार स्वाभिमान मेळावा मौजा पाऊलझोला येथे विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था यांच्या द्वारा व ग्रामसभांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले.त्या वेळी ते बोलत होते. 
मेळाव्याच्या  अध्यक्षस्थानी  दिलिप गोडे, कार्यकारी संचालक विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था हे होते.पाहुणे म्हणून अमित एस. कळसकर, सेवा निवृत्त मुख्य वन संरक्षक,प्रदुषन नियंत्रण बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी  हेमा देशपांडे,मोतीराम सयाम अध्यक्ष,सचिव तेजराम मडावी, नारायण सलामे सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती धमदिटोला उपस्थित होते.या  प्रसंगी  मोतीराम सयाम, अध्यक्ष सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती धमदिटोला यांनी, ग्रामसभेची गौण उपजावरील उपजिविकेचे साधन वाढविण्या करीता,  वन संरक्षण, संवर्धन करुन सामुहिक अधिकारात प्राप्त वनांचे आणी पाण्याचे विकास हाच आदिवासी व ईतर पांरपारीक वन निवासी वनहक्क धारकांचा खरा विकास आहे,असे मत मांडले . दिलिप गोडे यांच्या विशेष मदतीने आमच्या गावात पाण्याचा विकास निश्चितच झाला असुन त्यावर ग्रामसभे द्वारा मत्स्य पालनाचे कार्य सुरु आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  दिलिप गोडे,  यांनी अध्यक्षीय भाषणातून, वनहक्क प्राप्त  ग्रामसभांचे पदाधिकारी व सदस्याना संबोधित करीत, वनहक्क कायदा २००६ मधिल प्राप्त अधिकारांचा स्वाभीमान मेळावा हा विकासात्मक कार्यासाठी व आपले अधिकार वनाचे मह्त्व तसेच आपले शेती व जंगलाचा विकास हा हेतुने आयोजित करण्यात आले आहे. समाज जर विचारांनी पक्का राहिला नाही,तर तो बहकतो.विकासाची मुळ परीभाषा म्हणजे माझा एकट्याचा नाही, तर समाजाचा विकास झाला पाहिजे.हे विचार धरुन जर ग्रामसभांनी कार्य केले, तर नक्किच आमच्या जंगलाचा व पाण्याचा विकास साध्य होवु शकते. माझे एकच ध्येय आहे, ज्या ग्रामसभा आपल्या विचारानी पक्क्या असतील. त्यांचे सोबत आम्ही निरंतर कार्य करु व निसर्गाने जे पाणी दिले आहे. त्याचा व्यवस्थीत वापर व तलावांचे विकास करुन आपली शेती व मत्स्य व्यवसायाला सुजलाम सुफलाम करण्यास वनहक्क प्राप्त ग्रामसभांना सहकार्य करु.असे मत व्यक्त केले. 
देशात वनहक्क कायदा २००६ पारीत होउन,  ग्रामसभांना वनावरील मालकी हक्क प्राप्त झाले. ज्यामुळे वनांचे व तालावातील व ईतर जैवविविधता याचे संवर्धन, संरक्षण व योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सुद्धा कायद्यानी दिली आहे. 
आज हळु-हळु जमिनीतील जलस्तर खाली चालले. त्याचे पुनरभरन करण्याचे कार्य व्हायला पाहिजे. त्या करीता गावातील व जंगलातील तलाव, बंधारे, मजगी, शेततळे या सारखे कामे करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे विषेश अतीथी  अमित एस. कळसकर, सेवा निवृत्त मुख्य वन संरक्षक, नागपुर यांनी पुढे आपल्या भाषणातून केले.  
मेळाव्यात ग्रामसभा महासंघाचे सचिव  तेजराम मडावी, अध्यक्ष नारायण सलामे यांनी तेंदु हंगाम २०२१ मधिल तेंदु पाने संकलनातुन गृप ऑफ ग्रामसभेत समाविष्ट एकुण २७  ग्रामसभांना ३,६४,५९,३६७ कोटी रुपये प्राप्त झाले. ज्यात प्रत्यक्ष २९४३ परीवारास व अप्रत्यक्ष सरासरी ९००० वनहक्क धारकांना आर्थिक लाभ झाला. त्याच प्रकारे तेंदु मधिल व्यवस्थापनाचे रक्कमेतुन ग्रामसभेनी धमदिटोला येथे २ एकर जागा खरेदी करुन, ग्रामसभा महासंघाचे  स्वतःचे भवन कार्य शुरु केले आहे. तसेच  पुढे भविष्यात वन गौण उपज साठणुकी करीता गोदाम बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. याकरीता  दिलिप गोडे वनहक्क कायद्याचे तज्ञ यांनी सहकार्य व मदत करावी. असे मत व्यक्त केले. जर कोणी वनांचे व किंवा पर्यावरनाला हानी पोहचविन्याचे कार्य करित असेल तर, आम्ही ग्रामसभेस सहकार्य करु. ग्रामसभेला वनहक्क कायद्यानी फार मोठे अधिकार दिले, त्याचा वापर करुन आपले गाव व तलाव प्रदुषण मुक्त ठेवा. असे प्रतिपादन प्रदुषन नियंत्रण बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी  हेमा देशपांडे यांनी करुन, प्रदुषण व पर्यावरण यावर उपस्थीत लोकाना माहिती दिली.  
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  ललित भांडारकर यांनी केले. तर कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत  केवळराम मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत ईखार कार्यक्रम अधिकारी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था यानी केले. वार्षिक तेंदु व स्वाभिमान मेळाव्यात एकुण २७ ग्रामसभांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.