छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट पर्यंत शोभायात्रा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मार्च २०२२

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट पर्यंत शोभायात्रास्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज २१ मार्च रोजी तिथीनुसार जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहात कार्यक्रम घेण्यात आले. पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. जयंतीनिमित्त सर्वत्र ढोल ताशाच्या गजरात 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करीत मिरवणुका काढण्यात आल्या. विविध कार्यक्रम, विविध स्पर्धां व सामाजीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकासह कलाकारांनी सहभाग नोंदविला. मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकीवर भगवे झेंडे लावून तरुणांनी मिरवणूका काढल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सकाळपासूनच मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.