निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोपिय कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ मार्च २०२२

निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोपिय कार्यक्रम


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती : चिरादेवी- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय , भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत दिनांक १५ मार्च  २०२२ ला  चिरादेवी येथील शिबिराचा समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष. डॉ  एल.एस.लड़के , प्राचार्य नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती प्रमुख अतिथी धनराज आस्वले माजी प्राध्यापक बहरीन गल्फ,  निरुपला ताई मेश्राम सरपंच, चिरादेवी, दीपालीताई मोरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे, किशोरजी  भोयर,  हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे यानी राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात आयोजित केलेले बौद्धिक मार्गदर्शक, सामाजिक कार्यक्रम तसेच केलेला सामाजिक कार्याचा आढावा  मांडला. त्या नंतर  श्री.धनराजजी आस्वले यांनी  जिद्द आणि चिकाटी  च्या सहाय्याने आपण जीवनामध्ये  कसे यशस्वी होऊ शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात  डॉ  एल.एस.लड़के यानी शिबिरातील विद्यार्थ्यांना खरे शिक्षण म्हणजे काय आणि आपण त्याचा  उपयोग जीवन जगतांना कसा करायचा याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्रा. कुलदिप भोंगळे यानी केलें. या कार्यक्रमाला रासेयो विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व धनश्री घुगुल तसेच सुहानि बच्छावत, जाई पांढरे हे माजी विद्यार्थी  देखील उपस्थित होते.