श्रमिक कामगार संघटनेचा पहिल्याच दिवशी संपाला संमिश्र प्रतिसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ मार्च २०२२

श्रमिक कामगार संघटनेचा पहिल्याच दिवशी संपाला संमिश्र प्रतिसाद

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती: माजरी येथे माजरी-अखिल भारतीय श्रमिक कामगार संघटनेच्या संयुक्त आवाहनावर वेकोलि माजरीच्या संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय पातडीवर १० श्रमिक कामगार संघटनेने १९ सूत्रीय मागणीवरून दोन दिवसीय संप पुकारले आहे. दरम्यान माजरी क्षेत्रातील तीन कोळसा खाणीत सकाळ पासूनच संमिश्र प्रतिसाद आहे.

दोन दिवसीय संपामध्ये आज वेकोलि माजरी क्षेत्राच्या ओसीएम 2 ए चे कोळसा उत्पादन पूर्ण पणे बंद होते. तर नागलोन खुल्या कोळसा खदानीत अत्य अल्प प्रतिसाद आहे. चारही कोळसा कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य हाजरीघर येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. भारत सरकारच्या कामगार विरोधी, लोकविरोधी, लोक उद्योग विरोधी धोरणांच्या विरोधात आणि कोळसा उद्योग वाचवण्यासाठी २८ व २९ मार्च रोजी दोन दिवसीय रोजी संप पुकारले असून याला यशस्वी करण्याकरिता शेकडो कामगार कामावर आलेच नाही तर काही येऊन परत गेले.कोळसा उद्योग व्यतिरिक्त बॅंका, पोस्ट ऑफिस, व इतर शासकीय यंत्रणा बंद होत्या.

यावेळी इंटक कामगार संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव परमानंद चौबे,अनिल सिंग,दिलीप पारखी, चंद्रकांत बोढाले, सुनील श्रीवास्तव, बाळकृष्ण बहादे, धर्मा गायकवाड, सिटूचे अध्यक्ष मेहमूद खान, सचिव राजेंद्र प्रसाद गेडाम, मुकुंदराज वासनिक, विनोद बोबडे, डी एस रामटेके, एचएमएसचे अध्यक्ष राजेंद्र कायस्थ, सचिव शंभू सिंग, सुरेश केवट, मनोज रामटेके आणि आयटकचे अध्यक्ष दीपक ढोके, सचिव बंडू उपरे,मोहन सोरते,वासुदेव सातारकर, असिफ खान, महेंद्र गज्जलवार, सुनील सिडाम आदी संपाच्या स्थळी उपस्थित होते.