माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्काराने सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मार्च २०२२

माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्काराने सत्कारसामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  यांच्या हस्ते आज २० मार्च रोजी सत्कार करण्यात आला. सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. 


मुंबईत हा सत्कार सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ आणि वन खातं होतं. यावेळी त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली होती. विशेष म्हणजे त्यांनी वृक्षरोपणाचा धडका लावला होता. तसेच वृक्षरोपण करणाऱ्या संस्था, संघटनांनाही प्रोत्साहित करण्याचं काम केलं होतं. त्याचीच दखल घेऊन मुनगंटीवार यांना सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन गौरवण्यात आलं. 


यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर, यांची देखील उपस्थिती होती.