०१ मार्च २०२२
खोडशिवनी येथे खासदार क्रिडा महोत्सवाला रंगारंग सुरुवात.
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.1 मार्च:-
मोरगाव अर्जुनी विधानसभा अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथे खासदार क्रिडा महोत्सवाला इंजी. राजकुमारजी बडोले माजी मंत्री यांच्या हस्ते सुरुवात झाली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर गटनेते जि.प.गोंदिया,रचनाताई गहाणे जिल्हा परिषद सदस्या,तसेच प्रमुख उपस्थिती अशोक लंजे तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी व हर्ष विनोदकुमार मोदी महामंत्री युवा मोर्चा गोंदिया जिल्हा, जि.प. सदस्य कविताताई रंगारी, जि. प .सदस्य भूमेश्वर पटले, छायाताई चौहान ,निशाताई तोडासे जि. प. सदस्य, चंद्रकला ताई डोंगरवार जि.प.सदस्या, रंजना भोई, रंजना गोबाडे , निशाताई काशीवार , संगीता खोब्रागडे, दिपाली मेश्राम,यांच्या हस्ते ग्राउंड पुजन करण्यात आले. आपल्या क्षेत्राच्या युवकाना एक चांगला मंच उपलब्ध व्हावा व त्यांच्या मानसिक व बौद्धिक विकास व्हावा. याकरिता क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. असे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.यामध्ये कबड्डी सामना करिता विधानसभा स्तरावरील प्रथम बक्षीस 15000 रुपये, द्वितीय 11000 रुपये आहे. विधानसभा स्तरावर जिंकणाऱ्या खेळाडूंना लोकसभा स्तरावर जाण्याची संधी प्राप्त होणार आहे. यावेळी उपस्थित लक्ष्मीकांत धानगाये राष्ट्रीय सदस्य अनु जमाती आघाडी, गौरेश बावनकर सहसयोजक ,जीवन लंजे, शालीनदर कापगते, गिरधारी हत्तीमारे माजी सभापती, राजेश कठाणे माजी उपसभापती , चेतन भाऊ वडगाये पंचायत समिती सदस्य, शंकर खेकरे , मदन साखरे, पुरुषोत्तम निंबेकर , विलास बागडकर तालुका अध्यक्ष, गणेश कापगते बोपाबोडी, ललित डोंगरवार,टेकराम परशूरामकर उपसरपंच ग्रां.पं.खोडशिवनी,ऊर्मिला जयेंद्र कगांले सरपंच ग्रां.पं. खोडशिवनी, नरेंद्र लंजे ग्रा.पं.सदस्य खोडशिवनी, उमेश इलमकर ग्रामपंचायत सदस्य खोडशिवनी ,ग्यानिराम बंसोड, सुभाष मेश्राम, राजू परशूरामकर, शंकर लंजे प्रवीण कापगते, महेश परशूरामकर, विवेक बळबुद्धे , पुरुषोत्तम लंजे,नाजूक गोबाडे, देवराम लांजे, तुळशीदास लांजे, भास्कर दरवडे, चंदू लांजे, अनिल लंजे, हितेश मेश्राम, सौ स्नेहा हर्ष मोदी,
तसेच हिना कैलाश मुनेस्वर हिचे काल नुकतेच जिल्ह्यात आगमन झाले, तीने नेपाळ येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. तिथे तिने पुन्हा स्वर्णं पदक पटकावले. तीचे आत्तापर्यंतचे हे तिसरे स्वर्ण पदक आहे, खासदार क्रिडा महोत्सानिमित्त कार्यक्रमात तिचा सत्कार करण्यात आला.तिने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी व युवा कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
