पचखेडी येथे ३२ नाभिक बांधवांनी केले रक्तदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मार्च २०२२

पचखेडी येथे ३२ नाभिक बांधवांनी केले रक्तदान

पचखेडी येथे ३२ नाभिक बांधवांनी केले रक्तदान
वेलतूर- शरद शहारे :दि. 7 मार्च २०२२
कुही तालुक्यातील पचखेडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच,  वेलतूर,पचखेडी, मांढळ, कुही व आकाशझेप फाऊंडेशन, रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान आणि डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने ‘ऐच्छिक रक्तदान शिबीर’ घेण्यात आले. यावेळी ३२ रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान करून मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले. सरपंच  प्रांजल चौधरी, उपसरपंच दिनेश टांगले यांचे हस्ते दीप प्रज्वलन व संत नगाजी, संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व आकाशझेपचे संस्थापक सचिव साक्षोधन कडबे यांनी बोलतांना, “मनाम एकता मंच द्वारा सामाजिक बांधिलकीतून निरंतर सुरू असलेले सेवाभावी कार्य हे गौरवास्पद असून भारतीय समाजाच्या एकात्मतेला बळ देणारे आहे असे प्रतिपादन केले.” यावेळी एकता मंचचे जिल्हाध्यक्ष वैभवराव तुरक, पदाधिकारी नितीन पांडे, प्रविण निंबाळकर, भूषण सवाईकर, रविंद्र नक्षने, ह.भ.प. उरकुडे महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. 
      कार्यक्रमाला सर्वश्री मोहन पोहनकर, रविकांत खेडकर, सेवक सूर्यवंशी, संदिप लांजेवार, सोमेश्वर सूर्यवंशी, सुरेश चन्ने, सुरेश पोहनकर, वंसता पोहनकर, मदन पोहनकर, युवराज कावळे, सेवक मुऴे, उरकुडे महाराज, युवराज सूर्यवंशी, मोहन पोहनकर, प्रकाश फुलबांधे, हरिहर खडसिंगे, योगेश खंडे, चक्रधर कुंडले, मिथुन कुंडले, विलास उरकुडे, मनिष कडुकार गणेश फुलबांधे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. शिबीराच्या यशस्वितेसाठी मोलाची भूमिका बजावल्याबद्दल मनाम एकता मंच जिल्हाध्यक्ष वैभव तुरक व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांचे हस्ते मनाम एकता मंच, पचखेडी टीम व डागा रक्तपेढीचे बीटीओ डॉ. रविंद्र पांडे, पीआरओ वर्षा बालपांडे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. भूषण सवईकर यांनी संचालन तर चक्रधर कुंडले यांनी प्रमुख अतिथी, डागा शासकीय रक्तपेढी नागपूर, रक्तदाते व उपस्थितांचे आभार मानले.