हा चित्रपट बघून आमिरच्या डोळ्यात आले पाणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मार्च २०२२

हा चित्रपट बघून आमिरच्या डोळ्यात आले पाणी‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नावं झुंड आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात (#AayaYeJhundHai streaming now across platforms.) प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर आमिरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.


‘झुंड’ हा आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट पाहताना आमिरला अश्रू अनावर झाले. चित्रपटाचा शेवट झाल्यानंतर स्क्रिनिंगला उपस्थित असलेल्या सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. “चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. चित्रपटात मुलांनी तर अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. हा चित्रपट पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा तर तुम्ही फुटबॉल केला”, असं आमिर नागराज यांना म्हणाला.

#AayaYeJhundHai streaming now across platforms

amitabhbachchan