कोण होणार करोडपती नोंदणीसाठी विचारलेले २० प्रश्न | KBC Marathi - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ मार्च २०२२

कोण होणार करोडपती नोंदणीसाठी विचारलेले २० प्रश्न | KBC Marathiकोण होणार करोडपती (KBC मराठी) ही कौन बनेगा करोडपती हिंदीची मराठी आवृत्ती आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की, मराठी भाषेतील टीव्ही शो हे महाराष्ट्रातील अनेकांना आवडतात आणि मोठ्या उत्साहाने पाहिले जातात. म्हणूनच जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल आणि तुमच्या शोचा भाग बनू इच्छित असाल. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे सामान्य ज्ञान (GK) चालू घडामोडींचे चांगले ज्ञान असले पाहिजे. या शोच्या माध्यमातून तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंत जिंकू शकता.

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आवाज यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.

ज्या इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली होती, त्यातील पात्र व्यक्तीची 16 मार्च रोजी ११ वाजता ऑनलाईन ऑडीशन घेण्यात आली . त्यात खालील २० प्रश्न विचारण्यात आले. 


१. चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची गोठ्या झाडून हत्या केली?

- वॉल्टर चार्ल्स रॅंड


२. युक्रेन येथून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय? 

- 'ऑपरेशन गंगा' 


३. टकमक टोक कोणत्या गडावर आहे ? 

- रायगड 


४. वि.स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?

- ययाती 


५ . आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते ? (International Cricket Council presidents)

- जगमोहन दालमिया


६.  नोव्हेंबर 2021 मध्ये कोणते भारतीय Twitter चे सीईओ बनले ?

- पराग अग्रवाल 


७. खालील चित्र ओळखा ?- अमोल कोल्हे 


८. खालील चित्रातील कलाकार सोनी मराठीवरील कोणत्या मालिकेत आहे?- अजूनही बरसात आहे 


९. बार्शी येथील भगवंत मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

- सोलापूर 


१०. महात्मा गांधीचे जन्मगाव कोणते?

पोरबंदर 


११. चैत्र व वैशाख यांच्या मध्ये कोणता ऋतू येतो?

- वसंत


१२. संत ज्ञानेश्वर यांची समाधी कुठे आहे?

- आळंदी  


१३. सर्वात पहिला वेद कोणता ? 

- ऋग्वेद 


१४. घाशीराम कोतवाल नाटकाचे लेखक कोण ?

- विजय तेंडुलकर 


१५. धारापुरी येथे कोणती लेणी आहे.?

-  एलिफंटा 


१६. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका कोणी केली 

- रोहिणी हट्टंगडी 


१७. मानवाच्या नख व केसात कोणते प्रोटिन आहे 


१८. 21 एफ्रिल 1526 ला कोणती लढाई झाली?

-  पानीपल पहिली लढाई 


१९. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कुठे केली ?

- तोरणा किल्ला 


२०. पावनखिंडला पूर्वी कोणते नाव होते ?

घोडखिंड  

Sony Marathi channel is going to start a new season of Kon Honaar Crorepati 2022. The Registration of this show will start from the 23rd of February 2022 till the 8th of March 2022. You can Register yourself for this show with miss call number 70390-77772.