ओबीसी संघटनांच्या वतीने बुधवार, 23 मार्च रोजी जंतरमंतर मैदान नवी दिल्ली येथे "धरणे आंदोलन" - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० मार्च २०२२

ओबीसी संघटनांच्या वतीने बुधवार, 23 मार्च रोजी जंतरमंतर मैदान नवी दिल्ली येथे "धरणे आंदोलन"
राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि देशातील विविध ओबीसी संघटनांच्या वतीने बुधवार, 23 मार्च 2022 रोजी जंतरमंतर मैदान नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते दुपारी 2. "धरणे आंदोलन" व दुपारी 2.30 ते 6 या वेळेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, ओबीसी समाजाला राज्य आरक्षणासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्त करून 243 (टी), 243 (डी) कलम सेक्शन 6 प्रमाणे ओबीसींना 27 % राजकिय आरक्षण देण्यात यावे, केंद्रात ओबीसी मंत्रालय स्वतंत्र व्हावे. , क्रिमी लेयरची मर्यादा वाढविणे, सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देने .केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयातील अनुशेष भरणे, आरक्षणात लादलेली ५०% मर्यादा हटवणे, त्याशिवाय बिगर आदिवासी शेतकऱ्यांना - वनपट्टेधारकांवर लादलेली तीन पिढ्याची अट रद्द करावी, आदी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.


"Dharne Andolan" on behalf of OBC organizations on Wednesday, March 23 at Jantar Mantar Maidan, New Delhi.