Top News

खासदार बाळू धानोरकर निधन : पार्थिव थेट वरोरा येथे दाखल | MP Balu Dhanorkar

आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास Congress’s only Lok Sabha MP from Maharas...

ads

सोमवार, मार्च २८, २०२२

गोंदिया - बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन 05 एप्रिलपासून धावणार.संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.27 मार्च:-
कोरोनाच्या काळात ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी हळुवार गतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात गोंदिया- वडसा -चंद्रपूर -बल्लारशा मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी भाकपच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने  मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन 5 एप्रिलपासून चालवण्याचा निर्णय. गाडी क्रमांक 08804/08803 गोंदिया - बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल गोंदिया येथून 05 एप्रिल 2022 पासून आणि बल्हारशाह जंक्शन 06 ​​एप्रिल 2022 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावेल.
गाडी क्र. 08804 गोंदिया - बल्लारशाह जंक्शन मेमू पॅसेंजर स्पेशल गोंदियाहून दररोज 17.05 वाजता सुटेल आणि बल्हारशाह जंक्शनला 23.45 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 08803 बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल बल्हारशाह जंक्शन दररोज 05.15 वाजता सुटेल आणि गोंदियाला 12.00 वाजता पोहोचेल.या ट्रेनमधील प्रवासादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे लागेल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.