श्रमिक एल्गारने घेतली आंदोलनकर्त्या एस. टी. कर्मचाऱ्यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१२ फेब्रुवारी २०२२

श्रमिक एल्गारने घेतली आंदोलनकर्त्या एस. टी. कर्मचाऱ्यांची भेट
एस. कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनात विलागिकरण करण्यासाठी मागील 106 दिवसापासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने आंदोलनकर्त्यांना अजूनही दाद दिली नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे कामगारांसाठी काम करणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेने आंदोलनकर्त्या ची भेट घेतली.
शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू न केल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंब जगविणे कठीण होत आहे. या जाचाला कंटाळून अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने दुखवटा आंदोलन सुरू करण्यात आला. याची दखल श्रमिक एल्गार संघटनेने घेत गरजू कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले. कर्मचाऱ्यांना ॲड. फरहात बेग, श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रवीण चिचघरे, उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, ॲड. कल्याण कुमार यांनी मार्गदर्शन केले.