शाश्वात स्वच्छता व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमSustainable Sanitation and Solid Wastewater Management Awareness Program - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ फेब्रुवारी २०२२

शाश्वात स्वच्छता व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमSustainable Sanitation and Solid Wastewater Management Awareness Program


चिचोली ग्रा.प.व शंकरराव चव्हाण विद्यालयाचा उपक्रम


विद्यार्थ्यानी दिल्या स्वच्छतेच्या घोषणा
*खापरखेडा-प्रतिनिधी*
स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ कार्यक्रमा अंतर्गत चिचोली ग्रामपंचायत (खापरखेडा) व शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शाशवत स्वच्छता आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन १६ फेब्रुवारी बुधवार ला सकाळी ११.३० वाजता शंकरराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.

यावेळी मंचावर सावनेर पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर गटविकास अधिकारी दीपक गरुड, गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, सावनेर पं.स.सदस्य राहूल तिवारी, चिचोली ग्रा.पं.सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, मुख्याध्यापक दीपक निगोटे, लक्ष्मण राठोड, केंद्र प्रमुख महेंद्र मरकाम, निघोट, गट समन्वयक प्रदीप बागडे, ग्रामविकास अधिकारी विजय लंगडे आदि मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगेबाबा महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून द्विप प्रजवलन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे गटविकास अधिकारी दीपक गरुड यांनी प्लास्टीक चा वापर कमीत कमी करणे, ते रिसायकल करणे तसेच १०० टक्के कुटुंबासाठी शौचालय निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले तर
गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे यांनी विद्यार्थ्यांना ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच कचरा, कचरा गाडीत टाकणे, प्लास्टीक निर्मुलन तसेच घन कचरा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांनी तालुका स्तरीय सार्वजनिक कार्यक्रमात प्लास्टिक बुक्यांचा वापर सोडून त्याऐवजी एक रोपटं देण्यात आल तर खऱ्या अर्थाने पर्यावरणाला मदत होणार असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात सभापती अरुणा शिंदे यांनी आजचा विद्यार्थी उद्या देशाचं भवितव्य घडविणार आहे त्यामूळे स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा २ ची सुरुवात शाळेपासून करण्यात आली आहे आपल्या घरापासूनच स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे तेव्हाच समाजात जनजागृती निर्माण होणार असल्याचे सांगितले
कार्यक्रमा दरम्यान जनजागृती करण्याच्या दृष्टीने कोरोना काळात शासनाने दिलेल्या अटी-शर्ती पाळून मोजक्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मुख्य राष्ट्रीय महामार्ग ते चिचोली पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅली दरम्यान "प्रत्येक मनात स्वच्छतेची ज्योत पेटवू या, प्रत्येक गाव सुंदर बनवू या" स्वच्छता अपनाना है, समाज में खुशीया लाना है" स्वच्छता असे जिथे, आरोग्य वसे तिथे" आदि फलक लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट सन्मवयक प्रदीप बागडे, संचालन गणेश चिखले तर आभार पुष्पा बढिये यांनी मानले. कार्यक्रमाला जि.प. शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर ग्रा.पं.कर्मचारी आदि उपस्थित होते.

Sustainable Sanitation and Solid Wastewater Management Awareness Program