डेबू सावली वृद्धाश्रम येथे संतश्रेष्ठ श्री संत गाडगेबाबा जयंती उत्सव सोहळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ फेब्रुवारी २०२२

डेबू सावली वृद्धाश्रम येथे संतश्रेष्ठ श्री संत गाडगेबाबा जयंती उत्सव सोहळा                     
  डेबू सावली वृद्धाश्रम देवाडा चंद्रपूर  येथे आज  संतश्रेष्ठ श्री संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रम पार पडला दरम्यान उपस्थित प्रमुख  मान्यवरांकडून गाडगेबाबा यांचे जीवनकार्यावर प्रबोधनात्मक विचार आणि मार्गदर्शन करण्यात आले ..!!           

जयंती कार्यक्रमाचे निमित्ताने लहान मुलांकरिता श्री संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य आणि विचार या विषयावर 'अ' गट आणि 'ब' गट विभागून  प्रश्नमंजुषा लेखी परीक्षा  घेण्यात आली , सदर परिक्षेत 150 मुला-मुलींनी सहभाग नोंदविला .        

 दोन्ही गटातून गुणांनुक्रमे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेत्या स्पर्धकास प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गौरवचिन्ह व बक्षीस  देऊन गौरव करण्यात आले तर इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर स्कुलबॅग आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आले ..!!  

                      कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. चव्हाण साहेब (से.नि. कार्यकारी अभियंता ),  मा. प्राध्या. दूषयन्त नगराळे सर , डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर , मा. सौ. कश्यप मॅडम ( सामाजिक कार्यकर्त्या ) अनिकेत दुर्गे (समाज प्रबोधनकार ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुभाषभाऊ शिंदे  यांचे मार्गदर्शन लाभले       दरम्यान सुधाताई मुळे यांनी  संत गाडगेबाबा यांचे कार्यावर प्रकाश टाकनारे स्वरचित गौरवगीत सादर केले ..!!          

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पन्नालाल चौधरी ,  प्रास्ताविक अरुण भोसकर , स्पर्धेची रूपरेखा राजेश क्षीरसागर , आभारप्रदर्शन  आणि पेपरपरिक्षणं निशा धोंगळे यांनी केले ..!!   कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता  पदाधिकारी भारतीताई शिंदे, सहदेवजी राऊत,शंकरजी भोजेकर,विकासजी भोजेकर ,स्नेहल शिंदे,जयश्री राऊत यांनी अथक प्रयत्न केले , हरीश जाधव,वासुदेवजी भिलकर, सविता भोसकर , ललिता भोजेकर ,वनिता भिलकर,प्रतीक्षा आवळे , शीतल काटकर , मीरा काटकर , हर्षित भोसकर , बंडू आवळे, सुमित्रा आवळे,शुभम भोसकर आणि बहुसंख्य  गाडगेबाबा विचारप्रेमी समाजबांधवाची उपस्थिती होती .. स्नेहभोजणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ..!!                   जय डेबूजी   🙏

Santshrestha Shri Sant Gadge Baba Jayanti Utsav Sohala