सरकार नगर येथे संपदा अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम sampada urban Bank - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ फेब्रुवारी २०२२

सरकार नगर येथे संपदा अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम sampada urban Bank
चंद्रपूर शहरातील सरकार नगर येथील संपदा अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमात बँकेचे ठेवीदार आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष एडवोकेट कल्याण कुमार, संचालक मंडळाचे एडवोकेट पारोमिता गोस्वामी, एडवोकेट फरहात बेग, विजय सिद्धावार, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, घनश्याम मेश्राम यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


मागील दोन वर्षांपूर्वी संपदा अर्बन बँकेची स्थापना करण्यात आली कोणाच्या काळात सर्वसामान्य माणसांना सेवा आणि सहकार्य करण्यासाठी या बँकेने पुढाकार घेतला या काळातही बँकेने ठेवीदारांच्या मदतीने आणि प्रतिनिधींच्या विश्वासातून मोठी उलाढाल केली आहे यानिमित्त ठेवीदार आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.