लोहारा गावाजवळ धावत्या ट्रॅव्हल्सला आग - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, फेब्रुवारी ०८, २०२२

लोहारा गावाजवळ धावत्या ट्रॅव्हल्सला आग

चंद्रपुर मूल मार्गावर असलेल्या लोहारा गावाजवळ धावत्या ट्रॅव्हल्स ने आज मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. यात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून ट्रॅव्हल्स मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नारायण नावाची ट्रॅव्हल्स चंद्रपुर वरून प्रवासी घेऊन गडचिरोली कडे जात होती.अशातच लोहारा गावाजवळ अचानक ट्रॅव्हल्स ने पेट घेतला. या घटनेत मात्र मोठी जीवितहानी टळली आहे.या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे.


Running Travels fire near Lohara village