म. वि. आघाडीने निवडणुकांपूर्वी महामंडळ जाहीर करा ! : खा. प्रफुल्ल पटेलांना विनंती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ फेब्रुवारी २०२२

म. वि. आघाडीने निवडणुकांपूर्वी महामंडळ जाहीर करा ! : खा. प्रफुल्ल पटेलांना विनंतीनिवडणुकांपूर्वी महामंडळे व जिल्हास्तरीय समिती जाहीर झाल्यास पक्षाला मोठी ताकद मिळेल असे मत प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले. प्रदेश काँग्रेस पक्षातर्फे खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन आगामी मनपा मध्ये आपण प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे अशा आशयाचे निवेदन प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी दिले. मनपा निवडणुकीत आपल्या पक्षाची उमेदवारांची परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा केली. मा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी मनपा काबीज करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पक्षाची प्रतिमा विश्वास जनतेकडून प्राप्त करून आगामी मनपा निवडणुकीचा उद्देश ठेवून कार्य करा असा सल्ला मा. प्रफुल्ल पटेल यांनी दिला. ह्या प्रसंगी माजी आमदार दीनानाथ पडोळे, बजरंगसिंह परिहार, जानबा मस्के ह्यांनी सुद्धा काही प्रस्ताव व सूचना सादर केल्या. ह्याबाबत संपर्कमंत्री व गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनादेखील अवगत करण्यात आले.
शिष्टमंडळात संजय शेवाळे, सरदार रवींद्र मुल्ला, लाला नागपुरे, सोपानराव शिरसाट, भाईजी मोहोड, दुष्यंत गाटकिने, विलास पोटफोडे, बबलू चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.