वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ तर्फे महिला भजन संमेलन संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० फेब्रुवारी २०२२

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ तर्फे महिला भजन संमेलन संपन्न
On the occasion of Shiva Jayanti  Women's Bhajan Sammelan on behalf of Rashtrasant Tukadoji Maharaj Krida Mandal


चंद्रपूर :- वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ इंदिरानगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी ला स्थानिक रेंजर कॉलेज समोरील पटांगणात राष्ट्रसंत प्रेरित महिला मंडळाचे भजन संमेलन आयोजित करण्यात आले होते. या भजन संमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मलाअर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.दिवसभर ताडाच्या गजरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. या भजन संमेलनामध्ये ३३ भजन मंडळ सहभागी झाले होते. सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भजन मंडळात सहभागी होणार्‍या महिलांना प्रोत्साहन बक्षी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
On the occasion of Shiva Jayanti Women's Bhajan Sammelan on behalf of Rashtrasant Tukadoji Maharaj Krida Mandal