सुजित तिवारी यांना राष्ट्रवादीतर्फे श्रद्धांजली ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ फेब्रुवारी २०२२

सुजित तिवारी यांना राष्ट्रवादीतर्फे श्रद्धांजली !
    दक्षिण - पश्चिम विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते स्व. सुजित मुन्ना तिवारी यांचे आकस्मिक निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फार मोठी हानी झाल्याचे दुःख माजी आमदार मा. दीनानाथ पडोळे यांनी व्यक्त केले. सुजित मुन्ना तिवारी हे एक आघाडीचे कार्यकर्ते असून पक्षाविषयी त्यांना अढळ निष्ठा होती असेही ते म्हणाले. प्रदेश चिटणीस तसेच माजी नगरसेवक दिलीप पनकुले यांनी सुजितच्या आकस्मिक निधनाने व्यक्तीशः माझी तर हानी झालीच, पण पक्षाचीदेखील अपरिमित हानी झालेली आहे असे भावपूर्ण उद्गार काढले. सातत्याने दक्षिण - पश्चिमचे नेते कोवीड - १९ ची शिकार होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी मा. धनराज फुले, श्री. अरविंद भाजीवाले यांनीसुद्धा आपल्या भावपूर्ण शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच संजय शेवाळे, दुष्यंत गटकिने, विलास पोटफोडे हेही या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या शोकसभेत प्रभाग ३५ चे नेते व काँग्रेस पक्षाचे नेते श्री. नरेश हिरणवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच दक्षिण - पश्चिमचे पदाधिकारी मच्छिंद्र आवळे, उषाताई चौधरी, प्रल्हाद वाहोकर, सोपानराव शिरसाट, बबलू चौहान, प्रशांत लांडगे, रामदास डोंगरे, उमाकांत मसराम, उत्कर्ष गाडबैल आदि उपस्थित होते.


NCP pays tribute to Sujit Tiwari