आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने केली डोक्यात गोळी घालून आत्महत्या | MLA's security guard commits suicide by shooting himself in the head - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ फेब्रुवारी २०२२

आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने केली डोक्यात गोळी घालून आत्महत्या | MLA's security guard commits suicide by shooting himself in the head
गडचिरोली-:- अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम (dharmav baba aram) यांच्या सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 फेब्रुवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली.

प्रमोद शेकोकर (pramod shekokar) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.अहेरी येथील पावर हाऊस कॉलनीतील अपार्टमेन्ट मध्ये रात्री 8 वाजताच्या दरम्यान प्रमोद शेकोकर याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली.मृतक पोलीस शिपायाची पत्नी ही सुद्धा पोलीस विभागात असून ती ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे.

घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.


MLA's security guard commits suicide by shooting himself in the head