त्यागमूर्ती माता रमाई यांची १२४ वी जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ फेब्रुवारी २०२२

त्यागमूर्ती माता रमाई यांची १२४ वी जयंती साजरी


त्यागमूर्ती माता रमाई यांची १२४ वी जयंती साजरीमूल: येथील लुम्बिनी महिला मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्र.१६ येथे दिनांक ७ February  २०२२ ला दुपारी ३.०० वाजता *त्यागमूर्ती माता रमाई* यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा आयु. भावना किशोर लाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु. सिंधूताई गोवर्धन, काजल दुधे सामाजिक कार्यकर्त्या या होत्या.

 आयु. प्रिया गेडाम, आयु. रोहिणी बनकर, आयु. सिंधूताई गोवर्धन यांनी रमाई  गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमात वॉर्डातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शिल्पा देवेंद्र बांबोळे  व उपस्थित पाहुण्यांचे आभार आयु. सुनीता देवगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. माया पुणेकर, स्वीटी रामटेके , मायाताई झाडे , ललिताबाई मेश्राम,बागडे मॅडम,भाग्यश्री तागडे,पल्लवी समर्थ, माधवी तेलसे,सीमा भसारकर, नीता रामटेके, वर्षा रामटेके, इंदूताई रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले.

Mata Ramai's 124th Jayanti celebrated