सोमवारी सात फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२

सोमवारी सात फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिरभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. लता मंगेशकर यांच्या निधानानंतर आता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबईतील दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमित त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

The state government has declared a public holiday in the state on Monday, February 7, 2022, to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar.