चंद्रपूर शहरात अस्वल झाडावर चढली; नागरिकांनी केली दगडफेक - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, फेब्रुवारी ०७, २०२२

चंद्रपूर शहरात अस्वल झाडावर चढली; नागरिकांनी केली दगडफेक

मूल रोड वरील एम ई एलजवळ अस्वल झाडावर चढली


चंद्रपूर शहरातील एम ई एलजवळ अस्वल झाडावर चढली


चंद्रपूर शहरातील मूल रोडवर असलेल्या MEl नाक्याजवळ दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता च्या सुमारास अस्वल झाडावर चढल्याची माहिती इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी दिली.

हा परिसर जंगललगत असून येथे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी नेहमीच भ्रमंती करीत असतात. मूल रोडवरील एम आय एल नाक्याजवळ वाघ, बिबट्या, अस्वल आणि अन्य प्राणी नेहमीच नागरिकांना दिसत असतात. आज 7 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी अस्वल झाडावर चढल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या नंतर लगेच इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी कार्यकर्तासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.


MEL जवळ झाडावर चढ़लेल्या अस्वल बघण्यास झालेल्या गर्दी-गोंगाट-आणि अति-उत्साही उपस्थिताकड़ून दगडफेक यामुळे सदर परिस्थितिमुळे 'अस्वल-मानव संघर्ष' स्थिति निर्माण झाली होती... माहिती मिळताच बघ्याची प्रचंड गर्दी वाढली होती.

तिथेही झाडावर चढलेलली अस्वल न बघता गर्दी करून, इतरांना बोलावून गोंधळ घालणे, हद तर तेव्हा झाली, जेव्हा अस्वल च्या दिशेने दगडफेक केली जात होती, गोंधळ घातला जात होते, तर सदर वन्यप्राणी बिथरला, कुणावर हल्ला झाला तर दोष कुणाला? असा सवाल इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केला आहे.

अलीकडे शहरात अनेक ठिकाणी अस्वल येणे, नागरी वस्तीजवळ आढळणे नवीन बाब नाही, तेव्हा "अस्वल-मानव संघर्ष" टाळण्यासाठी नागरिकांनी समजदारीची भूमिका घेणे अत्यावश्यक आहे, घटनेची माहिती वनविभाग देऊन त्यांना आवश्यक सहकार्य केल्यास कोणतीही अनुचित घटना टाळता येणे सहज शक्य आहे... शेवटी विसरून चालणार नाही की आपल्या शहराच्या सभोवताल वन्यप्राणी वावर इतर शहराच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे, असेही बंडू धोतरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

आजच्या घटनेत रामनगर पोलिसांच्या त्वरित हस्तक्षेप मुळे गर्दी पांगवीणे शक्य झाले. पुढील अनुचित घटना टळली, सोबतच चंद्रपूर वनविभाग रैपिड रेस्पांस यूनिट चे कर्मचारी आणि वनरक्षक पठाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शेवटी अस्वल सुखरूपरित्या जंगलाच्या दिशेने निघुन गेली...

In the city of Chandrapur, a bear climbed a tree