भूखंड स्वच्छ न झाल्यास सफाई शुल्काचे १० पट दंडात्मक कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२४ फेब्रुवारी २०२२

भूखंड स्वच्छ न झाल्यास सफाई शुल्काचे १० पट दंडात्मक कारवाई
खुले भूखंड तातडीने स्वच्छ करा

- १५ दिवसात भूखंड स्वच्छ न झाल्यास सफाई शुल्काचे १० पट दंडात्मक कारवाई
- ३ महिन्यांच्या आत करावे लागणार कुंपण
- वन्यप्राण्यांचा धोका लक्षात घेता मनपा करणार कारवाई

चंद्रपूर chandrapur| शहर महानरपालिका क्षेत्रात नागरीकांच्या मालकीचे अनेक खुले भूखंड आहे. मात्र तिथे बांधकाम केलेले नसल्यामुळे हे मोकळे भुखंड विविध प्रकारच्या आजारचे उगमस्त्रोत ठरत आहे. शिवाय मनपा हद्दीच्या सीमाभागातील खुल्या भूखंडावर झाडेझुडपे वाढून जंगली श्वापदासाठी सुरक्षित ठिकाण निर्माण होत आहे. त्यामुळे १५ दिवसांच्या आत भूखंडधारकांनी मालकीचे भूखंड स्वच्छ न केल्यास सफाई शुल्काचे १० पट दंड आकरण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.


नागरिकांनी जागा खरेदी केल्यानंतर ते एक वर्षाचे आत विकसीत होणे आवश्यक असते. परंतु भुखंडधारक वर्षानुवर्षे भुखंड विकसीत करत नसल्याने त्या ठिकाणी कचरा, घाण, सांडपाणी जमा होतो. त्याचा परिणाम शहराच्या स्वच्छतेस तसेच आजुबाजुचे नागरिकांच्या आरोग्यावर होते. शहर हद्दीतील सीमा भागामध्ये असलेल्या वस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वास्तव्य असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील खुल्या भूखंडावर असलेले झाडेझुडपे, कचरा भूखंडधारक नागरिकांनी साफ करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ctps परिसरामध्ये मागील आठवडाभरात वाघांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. वेकोली परिसर भागात अनावश्यक झाडेझुडपे वाढली असून, तिथेही अस्वल आणि अन्य वन्य प्राणी वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले आहे. चंद्रपूर शहराच्या सीमा भागात असलेल्या अनेक वस्तीमध्ये खुले भूखंड आहेत. या भूखंडांवर अनावश्यक झाडेझुडपे वाढली असून, तिथे जनावरे देखील बसून असतात. अशा वेळी जंगली श्वापदांचे आगमन होऊन हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील खुल्या भूखंडधारकांनी आपल्या भूखंडावरील अनावश्यक झाडे झुडपे आणि कचरा तातडीने साफ करावा तसेच ३ महिन्यांच्या आत भूखंडाभोवती कुंपण घालावे, अन्यथा मनपाच्या पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


- खुल्या भूखंडधारकांनी करावी नोंदणी
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या माध्यमातून खुल्या भूखंडधारकांची यादी तयार करण्यात येत असून, भूखंडधारकांची खालील लिंकवर क्लिक करून माहिती भरावी.
https://bit.ly/3LX52tn- cmcc मनपाने केली स्वच्छता
मागील काही दिवसांपूर्वी हवेली गार्डन भागात अस्वल फिरत असल्याचे निदर्शास आले. त्यानुसार महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने इथे असलेली अस्वच्छता दूर करून अनावश्यक झाडेझुडपे हटविण्यात आली. स्वच्छता विभागाच्या वतीने चंद्रपूर शहरातील विविध भागात अनावश्यक झाडेझुडपे हटवून परिसर स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे.