घनशाम मेश्राम यांनी घेतली आमदार सुभाष धोटे यांची भेट - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०२२

घनशाम मेश्राम यांनी घेतली आमदार सुभाष धोटे यांची भेट

श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम (Ghansham Meshram ) यांनी विद्यमान आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन जिवती तालुक्यातील मागील एक वर्षापासून सातबारा च्या प्रतिक्षेत असलेल्या 43 आदिवासी वनहक्क पट्टेधारकाना सातबारा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार यांनी हा प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन दिले.


मागील वर्षी वनहक्क पट्टे आमदार सुभाष धोटे ( MLA Subhash Dhote ) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मोजणी सुद्धा करण्यात आली मात्र हस्त लिखित सातबारा देणे बंद असल्याचे कारण देत शासन एक वर्षापासून 43 कुटुंबांना सातबारा पासून वंचित ठेवले असल्याची बाब आमदार यांच्या निदर्शनास घनशाम मेश्राम यांनी आणून दिली आहे.
Ghansham Meshram called on MLA Subhash Dhote