राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेबाबत प्रोत्साहित साठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थासोबत सभा #election #Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ फेब्रुवारी २०२२

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेबाबत प्रोत्साहित साठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थासोबत सभा #election #Chandrapur
भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांनी राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेबाबत प्रोत्साहित करण्याचे दृष्टीने आज २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना, चंद्रपूरच्या विद्यार्थासोबत सभा घेण्यात आली. 


या मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, व्हिडिओ मेंकीग स्पर्धा, भित्तीचित्र पोस्टर डिझाईन स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा या पाच प्रकारच्या स्पर्धांचा  समावेश असून  दि. 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहेत.


‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करून निवडणूक आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करण्यात येत आहे. ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा असून प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबत जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.